कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र-द्वितीय राज्य कोअर बैठकीचा अहवाल..📚

दिनांक 20 आणि 21 फेब्रुवारी 2021 रोजी सांगली येथे कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य या पूर्णवेळ खाजगी क्लासेस संचालकांच्या शिखर संघटनेची द्वितीय राज्य कोअर बैठक अतिशय उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाली.

सांगली जिल्हा शाखेने सर्वोत्कृष्ट नियोजन आणि आयोजन करून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात संघटना कशी असावी, त्याचे स्वरूप, कार्यप्रणाली ,संघटनेचा विस्तार ,नियमावली सह प्रत्येक कोअर सदस्यांचे हक्क ,कर्तव्य आणि जबाबदारी यासंदर्भात संघटनेचे ज्येष्ठ आणि विशेष सल्लागार श्री. संजय कुलकर्णी सर ( सांगली), श्री यशवंत बोरसे सर (नाशिक) ,संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. बंडोपंत भुयार सर (अमरावती) , संघटनेचे समन्वयक श्री. प्रताप गस्ते सर (सांगली), विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री. आनंद गंजीवाले सर (यवतमाळ), सांगली जिल्हा संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. प्रा. भीमराव धुळूबुळू सर या सर्वांनी उत्तमोत्तम मार्गदर्शन करीत संघटनेतील आपलें कार्य अनुभव सांगीतले…

दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी संघटनेची राज्यस्तरीय द्वितीय कोअर बैठक पार पडली, या बैठकीत सर्वप्रथम कोरोना महामारीच्या काळात आपले काही ज्ञात-अज्ञात व्यवसायिक बंधू मरण पावले, त्यांना श्रद्धांजली वाहून दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी नांदेड येथे संपन्न झालेल्या पहिल्या राज्य कोअर बैठकीतील घेतलेल्या निर्णयाचा आणि केलेल्या कार्याचा आढावा घेत इतिवृत्त वाचन झाले.

समर्पित सेवावृत्तीने कार्य करणाऱ्या प्रत्येक पूर्णवेळ खाजगी क्लासेस संचालकांच्या न्याय हक्क मागण्या शासन दरबारी आपल्या व्यवसायाशी संबंधित समस्या आणि आव्हानांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे व कोचिंग क्लासेस व्यवसाय क्षेत्रातील विविध नव-तंत्रज्ञान, शासकीय माहिती व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी सर्व बाबींसाठी संघटनेचे अधिकृत मुखपत्र गुरुवाणी या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

या बैठकीत ठरलेल्या अजेंड्याप्रमाणे राज्य संघटनेची बांधणी ,आजीवन सदस्यांचे स्वरूप, प्रत्येक जिल्हावार चर्चा व कोअर कमिटीच्या सदस्यांच्या कार्याचा आढावा, संघटनेतील सदस्यांच्या सामाजिक सुरक्षितता संदर्भातील सांगली येथील सारडा सरांनी आर्थिक सक्षमीकरण जीवन विमा निगम चे विविध प्लान्स इत्यादी संदर्भात माहिती दिली.सर्व सामान्य क्लासेस संचालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यास संघटनेतर्फे आर्थिक साह्य तसेच त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणे इत्यादी संदर्भात एक अभ्यास समिती नेमण्यात येईल.

टीम:कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य.

दिवसेंदिवस आपल्या व्यवसायातील समस्या वाढणार्‍या आणि अडचणीच्या ठरत आहेत त्यास शासन दरबारी योग्य पाठपुरावा करून आपल्या व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी शासनदरबारी तसेच न्यायालयीन लढ्यासाठी सज्ज होणे आपल्या व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे.

कोचिंग क्लासेस अधिनियमन आणि नियंत्रण कायदा 2018 मध्ये आपल्या व्यवसायाच्या स्वरूपाविषयी पुनर्विचार करण्यासाठी सूचना पाठवणे व त्यासोबतच कोरोना काळातील झालेल्या नुकसानीसाठी जनहित याचिका करणे, दुहेरी समूळ उखडून टाकण्यासाठी जलदगतीने प्रयत्न करणे इत्यादी बाबतीत सखोल चर्चा करून लवकरात लवकर यासंदर्भात कृती कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

बैठकीत इतर कोअर सदस्यांनी आपली संघटनेप्रती असलेली प्रामाणिक तळमळ व कटिबद्धतेसह आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत संघटनेसाठी कार्य करण्याचे अभिवचन दिले.

संघटनेचे समनव्यक श्री. प्रताप गस्ते सरांनी संघटनेच्या कार्यप्रणालीचं महत्व विशद करतांना आप-आपल्या कार्यक्षेत्रातील कोअर सदस्यांमधील समनव्यय साधून संघटनेचा विस्तार आणि ध्येय धोरणे सर्व-सामान्य क्लासेस संचालकापर्यंत पोहचविण्यासाठी आपलं योगदान कसं असावं ह्याचं मार्गदर्शन केलं .

श्री. वैजनाथ कानगुले सरांनी लवकरात लवकर मराठवाड्यातील उर्वरित जालना आणि औरंगाबाद जिल्हे जोडण्यासाठी पुढाकार घेतला, श्री. फैसल पटेल सर , श्री सुधाकर सावंत सर,श्री प्रा. एस. के. पठाण सर आणि माणिक कांबळे सरांनी इत्यादींनी दुहेरी संदर्भात आपल्या संघटनेच्या माध्यमातून न्यायालयीन लढाईसाठी आपण काय काय केलं पाहिजे या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं..

श्री. विजय डोशी (जिल्हा-अध्यक्ष:नाशिक) आणि श्री दीपक बेले (लातूर) यांनी समाजात वावरताना आपली ओळख म्हणून पिन तयार करावी अशी सूचना दिली. श्री संतोष रोडगे सरांनी (लातूर जिल्हा अध्यक्ष) यांनी संघटनेसाठी रिलीफ फंड तयार करण्यात यावी यावा अशी सूचना केली..

श्री. नागेश कल्याणकर सर ( नांदेड) श्री. संतोष आकुलवार सर ( यवतमाळ ) श्री. तुकाराम जाधव सर (कोल्हापूर ) आणि श्री. विशाल उराडे सर (जिल्हाध्यक्ष वर्धा) यांनी आपापल्या जिल्ह्यातील समस्या मांडल्या.

श्री. सुधीर यावलकर सर (अमरावती) श्री. निळकंठ पाटील सर (जळगाव) आणि श्री. आनंद गंजीवाले सर (यवतमाळ) इत्यादींनी संघटनेच्या माध्यमातून आपल्या संघटनेतील सर्वसामान्य क्लासेस संचालकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना संदर्भात पाठपुरावा केला.

श्री. ज्ञानेश्वर मस्के सर (नाशिक) आणि श्री राजेश पाटील सर (जळगाव) सह दादासो पांडव सर (कोल्हापूर) यांनी संघटनेच्या संघटनात्मक कार्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

ह्याव्यतिरिक्त राज्य-अध्यक्ष श्री. बंडोपंत भुयार सरांनी संघटनेच्या शिस्तीसाठी,संघटनात्मक बांधणी, संघटनेची नोंदणी फिस, सर्वसामान्य क्लासेस संचालकांच्या संघटनेप्रती असलेल्या अपेक्षा,त्यांच्या जबाबदाऱ्या, Whatsapp वर दिलेल्या सूचना पेक्षा प्रत्यक्ष संघटनेला दिलेलं योगदान,ह्या व्यवसाईक क्षेत्राशी असलेली बांधिलकीसह आपली कर्तव्यनिष्ठा आणि व्यवसाईक प्रतिष्ठेसह सामाजिक योगदान आणि येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आणि आपली भावी वाटचाल ह्यासंदर्भात मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या काळात आपली न्यायालयिन लढ्यासाठी आपली कार्य तत्परता स्पष्ट केली..

या राज्य कोअर बैठकीचं सुंदर आयोजन सांगली जिल्ह्याने केले होतं.

सांगली जिल्ह्याचं संघटनेतर्फे जाहीर हार्दिक आभार..🙏🏻

🤝🏻 आपणा सर्वांची साथ आणि विश्वास हेचं संघटचें खरे सामर्थ्य आहे…
🌹 धन्यवाद..🙏🏻
🎓 -आपलाच विनम्र स्नेही

विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख, परभणी.राज्य-सचिव (CCTFM)
🙏🏻 टीम:कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य.
👍🏻 सर्व अद्यवयत माहितीसाठी:
https://www.facebook.com/CCTFMaharashtra/

🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻