आदरणीय कोचिंग क्लासेस संचालक मित्रांनो नमस्कार,

कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र (CCTFM) या संघटनेची स्थापना होऊन आता तीन महिने झालेले आहेत. या दोन महिन्यांमध्ये संघटनेची वाटचाल अतिशय झपाट्याने झालेली आहे. राज्यामध्ये सर्वच कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना आत्ता आपल्या संघटनेबद्दल माहिती झालेली आहे .या मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या संघटनेची नोंदणीची महत्त्वाची प्रक्रिया पार पडलेली आहे.

आता आपली संघटना नोंदणीकृत झालेली आहे हे आपणाला सांगताना आनंद होत आहे, त्याचबरोबर नांदेड येथे संघटनेची महत्वपूर्ण कोर कमिटी ची प्रथम बैठक संपन्न झालेली आहे.

कोरोनाच्या भितीमुळे आठ महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस काही प्रमाणामध्ये नोव्हेंबरमध्ये तर काही प्रमाणामध्ये डिसेंबरमध्ये सुरू झालेले आहे.

तरी पण अजूनही शासनाने कोचिंग क्लासेस सुरू करण्या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही आणि म्हणून पुढील पंधरा दिवसांमध्ये शासनाकडून तशी घोषणा करण्यासाठी पाठपुरावा करणे हे संघटनेचे महत्त्वाचे कार्य असेल.

शाळा महाविद्यालया साठी असलेल्या SOP चे पालन करून आपण आपले क्लासेस राज्यांमध्ये ऑलरेडी सुरू केलेलेच आहे व पुढेही चालू ठेवावे.

शासन अधिकृत परवानगीही देत नसेल आणि पुढे जर कारवाई होत असेल तर पुढे उच्च न्यायालयाचा अधिकृत परवानगीसाठी दरवाजा ठोठावणे आवश्यक होईल असे वाटते. तशी याचिका टाकणे आवश्यक आहे.त्यामुळे आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढलेली आहे हे आपण लक्षात घ्यावे.

पुढील पंधरा दिवसांमध्ये संघटनेची वेबसाईट तयार होईल व बँकेमध्ये खाते सुद्धा काढले जाईल. तसेच पुढील ऑफलाईन कोर कमिटी मध्ये संघटनेचे मुखपत्र गुरुवाणी चे प्रकाशन करण्याचे नियोजित आहे.

संघटनेचा अध्यक्ष म्हणून या सर्व गोष्टीचे आपल्या समोर मांडणे माझे कर्तव्य आहे व आपणही सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्याला सहकार्य करावे असे मी आपल्याला आवाहन करतो. संघटना वाढीसाठी संघटनेला दिशा देण्याचे काम माझ्याकडून निश्चितच होईल. काय करायचे आहे व काय करायचे नाही ते निश्चित असणे आवश्यक आहे .

अनेक वर्षापासून सोबत काम केलेले राज्यातील वरिष्ठ, बुद्धिवान सदस्यांचे आपल्या संघटनेमध्ये नेहमीच स्वागत असेल. त्यांचे संघटनेमध्ये यथोचित स्वागत करून त्यांनाही काम करण्याची संधी दिली जाईल.मी संघटनेची माझ्या सहकार्‍यांसोबत मुहूर्तमेढ रोवताना किंवा अध्यक्षपद स्वीकारताना कोचिंग क्लासेस व्यावसायिकांसाठी काय करायचे याची खूणगाठ बांधली होती. मला काही विशिष्ट विषयांवर काम करायचे आहे.

राज्यामध्ये तीस चाळीस वर्षापासून किंवा त्याही पूर्वीपासून कोचिंग क्लासेस चे व्यवसायिक आपला व्यवसाय करत असतील ,परंतु राज्यामध्ये कोचिंग क्लासेसच्या अनेक संघटना असूनही कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना म्हणावे तसे संघटित कोणी करु शकले नाही किंवा राज्य शासना मध्ये आपले म्हणणे पटवून देऊन आपल्या मागण्या मान्य करण्या इतपत आपला दबाव निर्माण करू शकले नाही ही एक मोठी खंत आहे.

त्यामुळे CCTFM ची पुढील काही मुद्द्यावर जी स्पष्ट भूमिका आहे ते मी अध्यक्ष म्हणून मांडली पाहिजे व राज्यातील सर्वच कोचिंग क्लासेस व्यावसायिकांपर्यंत गेली पाहिजे, त्या दृष्टीने आपल्याला राज्यांमध्ये काम करावयाचे आहे.

मुद्दा क्रमांक 1:

Number of Students allowed per batch. – कमीतकमी कितीही विद्यार्थी एखाद्याच्या बॅचमध्ये असेल तरी चालेल परंतु कोचिंग क्लासेस च्या एका बॅचमध्ये जास्तीत जास्त 120 विद्यार्थी असावे असे संघटनेचे मत आहे. आणि या क्राइटेरिया मध्ये राज्यातील 95% क्लासेस बसतात. तसेही शासनाच्या ड्राप मध्ये 80 ते 120 विद्यार्थी असावे अशी शिफारस आहे.

मुद्दा क्रमांक 2. Dual Teachers चा मुद्दा:

राज्यातील कोणत्याही कोचिंग क्लासेस मध्ये शासनमान्य ,अनुदानित अथवा विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील शिक्षक शिकवायला असू नये असे संघटनेचे ठाम धोरण आहे.

मुद्दा क्रमांक 3.Attendance tie-up or integrated tie- up with colleges:

मोठ्या शहरांमध्ये जिथे कारपोरेट क्लासेस आहेत अशा प्रकारची क्लासेस शहरातील किंवा शहराबाहेरील किंवा इतर जिल्ह्यातील काही जुनियर कॉलेज सोबत संगणमत करून अशा ज्युनिअर कॉलेजमध्ये फक्त मुले प्रॅक्टिकल व परीक्षेसाठी जातात ,बाकी क्लासमध्ये शिकवणीसाठी असतात अशा पद्धतीमध्ये अनेकदा कुठलाही लेखी करार नसतो पण तोंडी बरीच तडजोड व देवघेव झालेली असते. अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे केवळ कार्पोरेट क्लासेस चालतात आणि स्थानिक स्तरावरील क्लासेसला प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होतात व असे कार्पोरेट क्लासेस खूप मोठमोठ्या जाहिराती करून विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करतात .त्यामानाने स्थानिक क्लास संचालक अशा जाहिराती त्याच्या आर्थिक अडचणी मुळे करू शकत नाही. एखाद्याने आपला व्यवसाय करताना जाहिराती करू नये असे संघटनेचे मत नाही परंतु तत्त्व आणि नीतिमत्ता पाळून व्यवसाय करावा या मताला संघटनेचा पाठिंबा आहे.

मुद्दा क्रमांक 4. Carporate Classes:

कार्पोरेट क्लासेसला आमचा विरोध नाही .पण मुद्दा पुन्हा तोच निर्माण होतो की त्या क्लासमध्ये जर दुहेरी शिक्षक असेल किंवा तो कार्पोरेट क्लास इंटिग्रेटेड असेल, टायप असेल आणि त्याच्या पैशाच्या आणि जाहिरातीच्या जोरामुळे सामान्य संचालकाचे नुकसान होत असेल तर अशा क्लासेसला विरोध संघटनेचा असेल.

मुद्दा क्रमांक 5.G.S.T. rate of 18%:

या मुद्द्याच्या बाबतीमध्ये संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझे स्पष्ट मत आहे की कोचिंग क्लासेस हा शैक्षणिक सेवा व्यवसाय आहे आणि म्हणून 18% असलेला जीएसटीचा स्लॅब हा खाली 5% वर शासनाने आणावा.

मुद्दा क्रमांक 6 Advertising Norms:

कोणत्याही कोचिंग क्लासेस ने चुकीच्या पद्धतीने खोट्या जाहिराती करू नये . जे स्वतःच्या क्लासचे विद्यार्थी गुणवत्ता मिळवत असेल, तर स्वतःच्याच क्लास च्या विद्यार्थ्यांचे फोटो प्रकाशित करावे . चुकीच्या व खोट्या जाहिराती करू नये अशा प्रकारच्या सदस्यांवर संघटनेनी कारवाई करावी .

मुद्दा क्रमांक 7.Online Platforms-(Byju,Vedantu,unacademy etc.)

अशा प्रकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला संघटनेचा ना विरोध असेल ना समर्थन असेल .कारण ऑनलाईन क्लासेस ची संकल्पना ही ऑफलाईन क्लासच्या संकल्पने पेक्षा वेगळी आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे त्यामुळे ऑनलाईन क्लासेस ज्याला ज्या पद्धतीने चालवता येते त्यांनी त्या पद्धतीने चालवावे.

मुद्दा क्रमांक 8.

राज्य शासनाने सर्व कोचिंग क्लासेस ची नोंदणी करून कोणत्याही जाचक अटी शिवाय नियमावली राज्यामध्ये लागू करावी व राज्यातील संपूर्ण कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना शिक्षक विभागाच्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदार म्हणून अधिकार बहाल करावा.

मुद्दा क्रमांक 9.

आदर्श शिक्षक पुरस्कार निवडतांना अनुभव व शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर कोचिंग क्लासेसच्या संचालकांचाही अशा पुरस्कारांमध्ये विचार करावा.

मुद्दा क्रमांक 10.

वैद्यकीय व्यावसायिकांच्या आय.एम.ए. व विधी व्यवसायिकांच्या बार कौन्सिल प्रमाणेच कोचिंग क्लासेस संचालकांची कोचिंग कौन्सिल असावी आणि त्यांना त्यांच्या व्यावसायिकांसाठी नियमावली तयार करण्यासाठी समितीचे गठण राज्य शासनाने पुढाकार घेऊन करावे.

मुद्दा क्रमांक ११.

आपण कोचिंग क्लासेस चे व्यवसायिक सर्वच पदवीधर आहोत म्हणून पुढे भविष्यामध्ये जिथे कुठे पदवीधर निवडणुका होतील किंवा सिनेटच्या निवडणुका होतील तिथे सर्व व्यवसायिकांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून आपला प्रभाव या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण करावा. याशिवाय अजूनही काही मुद्दे क्लास संचालकांच्या हिताचे असल्यास त्याच्यावरही विचार करता येईल.

कोचिंग क्लासेसच्या इतर संघटनांनी काय करावं याच्यापेक्षा मी माझ्या – आपल्या संघटनेने क्लासेस संचालकांच्या हितासाठी काय करावे याच्याबद्दल माझे views क्लिअर आहेत

या सर्व गोष्टींवर पुढील तीन वर्ष CCTFM संघटनेला व या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला काम करावयाचे आहे.

या सगळ्याच गोष्टी दीर्घकालीन आहेत त्यामुळे सगळ्याच गोष्टी करणे कदाचित शक्य होणार नाही. परंतु या करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील कोचिंग क्लासेस व्यवसायिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून CCTFM चे सदस्य जास्तीत जास्त संख्येने व्हावे व CCTFM ला बळकट करावे, जेणेकरून कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना जी प्रतिष्ठा एवढे वर्षापासून मिळाली नाही, ती प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मला प्रयत्न करता येईल .

अर्थातच ही अतिशय कठीण जबाबदारी आहे व याला खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो , पण अशक्य मात्र नाही तरीही व्यावसायिकांसाठी CCTFM मधील माझ्या सहकार्‍यांच्या सहकार्याने माझी या सर्व गोष्टींवर काम करण्याची ची तयारी आहे. राज्यातील ज्या कोणी क्लासेस संचालकाला माझ्या सोबत संपर्क करायचा असेल तर तो सदस्य सायंकाळी ९ ते १० च्या दरम्यान माझ्या सोबत संपर्क करू शकतो.

धन्यवाद

🎓 आपलाच स्नेही
प्रा. बंडोपंत भुयार ,
+919420123994
राज्य अध्यक्ष,
कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र.
https://www.facebook.com/CCTFMaharashtra/